सीएपीवायची यशस्वी कामगिरी
सीएपीवायची यशस्वी कामगिरी
अॅथलेटिक स्पर्धेत ११ सुवर्णांसह २२ पदकांची कमाई
ठाणे, ता. १ (बातमीदार) : ठाणे जिल्हा कनिष्ठ गट अॅथलेटिक स्पर्धा २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत सीएपीवायच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ११ सुवर्ण, तीन रौप्य आणि आठ कांस्य अशी एकूण २२ पदके पटकावली. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ गट अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी सीएपीवाय संघाच्या सात खेळाडूंची निवड झाली आहे.
विविध वयोगटात झालेल्या स्पर्धेतील १० वर्षांखालील मुलींच्या गटात अन्वी मोरे हिने स्टँडिंग शॉट पुट प्रकारात रौप्यपदक जिंकले, तर १४ वर्षांखालील मुलींच्या गटात काव्या कनागळे हिने ८० मीटर धावण्यात सुवर्ण, तर लांब उडीमध्ये रौप्यपदक पटकावले. इरा जाधवने ३०० मीटर धावण्यात कांस्यपदक प्राप्त केले. काव्या कनागळे, इरा जाधव, मायरा सबनीस आणि शुभ्रा करंदीकर यांनी ४ गुणीले १०० मीटर रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकून संघाची मान उंचावली. त्याचबरोबर आठ वर्षांखालील मुलांच्या गटात युवान भावसारने स्टँडिंग बोर्ड उडीत सुवर्ण, तर ५० मीटर धावण्यात कांस्यपदक पटकावले. १२ वर्षांखालील मुलांच्या गटात अर्चित मोरेने ६० मीटर धावण्यात कांस्यपदक मिळवले. तसेच अर्चित मोरे, अक्षित नायर, आरव कर आणि लियाम फर्नांडिस यांनी ४ गुणीले १०० मीटर रिले प्रकारात कांस्य पदक जिंकले. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात स्नेह कामेरकरने ८० मीटर धावण्यात सुवर्णपदक पटकावले. तसेच आरव विनेरकरने ३०० मीटरमध्ये रौप्य, तर ८० मीटरमध्ये कांस्यपदक मिळवले. स्नेह कामेरकर, आरव विनेरकर, आदित बोंद्रे आणि स्पर्श पाटील यांनी ४ गुणीले १०० मीटर रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकले. राज्यस्तरीय स्पर्धेतही हे खेळाडू चांगली कामगिरी करतील, अशी खात्री प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

