आमदारांकडून शिवसैनिकांचे खच्चीकरण

आमदारांकडून शिवसैनिकांचे खच्चीकरण

Published on

उरण, ता. १ (वार्ताहर) : कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे पक्षवाढीसाठी प्रयत्न न करता जाणीवपूर्वक शिवसैनिकांचे खच्चीकरण करीत असल्याचा दावा शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी केला आहे. उरण आणि पनवेलमध्ये झालेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोरवे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, यासंदर्भात भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

अतुल भगत म्हणाले, की उरण आणि पनवेलमधील निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याची जबाबदारी आमदार महेंद्र थोरवे यांची होती, मात्र त्यांनी स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना मदत करण्याऐवजी भाजपच्या आमदारांना कशी मदत होईल, अशी भूमिका घेतली. थोरवे यांनी उत्तर रायगडचे एकमेव आमदार असल्याचा दावा केला, पण प्रत्यक्षात त्यांनी भाजपला पूरक ठरेल असेच राजकारण केले, असेही भगत यांनी नमूद केले.

भगत यांनी पुढे सांगितले, की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ३० जागांपैकी शिवसेनेला एकही जागा सोडली गेली नाही. भाजपला पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिकांना एबी फॉर्म भरूनही अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले. तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोटो आणि धनुष्यबाण हवा आहे, पण आमच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी का नको, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी भगत यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले आणि किरण दळवी यांनी उरण-पनवेलकडे लक्ष देऊन कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

अनेकांचा दुसऱ्या गटात प्रवेश
पनवेल महापालिका निवडणुकीत खारघर, कामोठे आणि नवीन पनवेलच्या प्रमुख शहरप्रमुखांना डावलण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांशी चर्चा करूनही थोरवे यांनी योग्य पाठपुरावा केला नाही. यामुळे शिवसेनेच्या अनेक सक्षम कार्यकर्त्यांना तिकीट मिळाले नाही. परिणामी पक्षाचे नुकसान झाले आणि काही नेत्यांनी दुसऱ्या गटात प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com