बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांचा संतापाचा उद्रेक
रेल्वे प्रवाशांचा उद्रेक
बदलापूरमध्ये लोकल उशिरा, अपुऱ्या फेऱ्यांमुळे संताप
बदलापूर, ता. १ (बातमीदार) ः रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी प्रवाशांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. शनिवारी लोकल पकडण्याच्या प्रयत्नात तरुणीचा लोकलखाली येऊन मृत्यू झाल्यानंतर प्रवाशांचा रविवारी संयम सुटला. या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत महिला व पुरुष प्रवाशांनी स्टेशन मास्तर कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करून आंदोलन केले. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त करीत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
बदलापूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या काही लोकलमध्ये अर्धा ते पाऊण तासाचे अंतर आहे. तर बहुतांश लोकल रोज उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळच्या कामाच्या घाईत लोकल वेळेवर न मिळाल्याने अनेकांना नोकरीच्या ठिकाणी उशिरा होतो. परिणामी लेट मार्क लागतो आणि वरिष्ठांची बोलणी ऐकावी लागतात, अशी व्यथा प्रवाशांनी मांडली. आधीच महागाई, कौटुंबिक अडचणी आणि मानसिक तणावात असताना लोकल प्रवासाचा त्रास आता जीवावर बेतत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.
रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
रोज वेळेत कामावर पोहोचण्याच्या धावपळीत येईल ती लोकल पकडण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यामुळेच असे अपघात घडतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवासी संघटना सातत्याने करीत आहेत. मात्र रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच असे मृत्यू होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

