कामोठेमध्ये फुटपाथ मोकळे करण्यासाठी पालिकेची कडक कारवाई

कामोठेमध्ये फुटपाथ मोकळे करण्यासाठी पालिकेची कडक कारवाई
Published on

कामोठेमध्ये फुटपाथ मोकळे करण्यासाठी पालिकेची कडक कारवाई
पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिक्रमण व अनधिकृत बॅनर हटवले
पनवेल, ता. १ (बातमीदार) : कामोठे परिसरात फुटपाथवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघातांचा धोका वाढला होता. ही बाब लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत जोरदार धडक कारवाई करण्यात आली. ता. ३० जानेवारी रोजी मानसरोवर, खांदेश्वर व कामोठे रेल्वे स्थानक परिसर तसेच छोटा खांदा गावात फुटपाथवरील अतिक्रमण व अनधिकृत बॅनर हटविण्याची मोहीम राबविण्यात आली.
महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत नीरा टपऱ्या, हातगाड्या तसेच फुटपाथवर अडथळा निर्माण करणारी दुकाने हटविण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत बॅनर व फलकही काढून टाकण्यात आले.
या कारवाईमुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालण्यासाठी मोकळा फुटपाथ उपलब्ध झाला असून, वाहतूकही सुरळीत झाली आहे. भविष्यात पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com