घाटकोपर स्थानकाबाहेर रिक्षा कोंडी
घाटकोपर स्थानकाबाहेर रिक्षा कोंडी
प्रवाशांची गैरसोय; कारवाईची मागणी
घाटकोपर, ता. १ (बातमीदार) : मुंबई मेट्रो लाइन-१ आणि मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकामुळे प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, घाटकोपर हे पूर्व व पश्चिमेला जोडणारे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. वर्सोवा-घाटकोपर मेट्रो मार्गामुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली, तरी स्थानकाबाहेरील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न मात्र गंभीर बनत चालला आहे.
प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे स्थानकाबाहेरील रस्ते मोकळे असणे आवश्यक असताना, वाढते शेअर रिक्षा स्टँड आणि बेशिस्त रिक्षाचालकांमुळे स्थानक परिसरात सातत्याने कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
विशेषतः घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालक हे प्रवासी भरण्यासाठी रस्त्यातच रिक्षा उभ्या करत असल्याने अन्य वाहनांच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
स्थानक परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
रिक्षाचालकांची अरेरावी खूपच वाढली आहे. रिक्षाचालकांकडून जवळच्या अंतरासाठी नकार दिला जातो आणि लांबचे भाड्याला पसंती दिली जाते. त्यामुळे अनेकदा शाब्दिक वाददेखील होतात. रेल्वे स्थानकाबाहेर संध्याकाळच्या सुमारास वाहतूक पोलिस कार्यरत असायला हवेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई व्हायला हवी.
- मनोहर जरियाल, सामाजिक कार्यकर्ते
फोटो - 360, 361
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

