नॉट रीचेबल नगरसेवक मधुर म्हात्रे परतले घरी
‘नॉट रिचेबल’ नगरसेवक मधुर म्हात्रे घरी परतले
गुलाल उधळून जल्लोषात स्वागत
कल्याण ता. २ : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर प्रचंड चर्चेत राहिलेले प्रभाग क्रमांक १३चे नगरसेवक मधुर म्हात्रे रविवारी (ता. १) सायंकाळी अखेर घरी परतले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ते ‘नॉट रिचेबल’ असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. त्यांच्या आगमनानंतर समर्थकांनी फटाक्यांच्या कडकडाटात आणि गुलालाची उधळण करीत त्यांचे जंगी स्वागत केले.
मूळच्या शिंदे सेनेत असलेल्या मधुर म्हात्रे यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने शिवसेना ठाकरे गटातून निवडणूक लढवली होती. या चुरशीच्या लढतीत त्यांनी भाजपचे माजी उपमहापौर विक्रम तरे यांचा पराभव करून विजय मिळवला; मात्र विजयानंतर अवघ्या काही वेळातच त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते इतर तीन नगरसेवकांसह अचानक गायब झाले.
मधुर म्हात्रे बेपत्ता झाल्यामुळे कल्याणच्या राजकारणात मोठे वादळ उठले होते. त्यांच्या अनुपस्थितीत ठाकरे गटाच्या ११ पैकी ७ सदस्यांनी आपली गट नोंदणी करून घेतली. म्हात्रे यांच्याशी संपर्क होत नसल्याने संतप्त पक्ष पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्वेमध्ये ‘बेपत्ता नगरसेवक’ अशा आशयाचे पोस्टर्स लावले होते, ज्याची राज्यभर चर्चा झाली होती.
पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
रविवारी सायंकाळी मधुर म्हात्रे आपल्या घरी पोहोचताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले, तर समर्थकांनी जल्लोष केला. या स्वागताचे व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहेत. १५ दिवसांच्या या ‘नॉट रिचेबल’ नाट्यानंतर म्हात्रे आता नेमकी कोणती राजकीय भूमिका घेतात आणि ते ठाकरे गटातच राहतात की पुन्हा स्वगृही परततात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

