प्रथम नागरिकाचा आज निकाल

प्रथम नागरिकाचा आज निकाल

Published on

प्रथम नागरिकाचा आज निकाल
वसई-विरार पालिकेत महापौर विराजमान होणार
वसई, ता. २ (बातमीदार)ः वसई-विरार शहर पालिकेत शुक्रवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे साडेपाच वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात येताना पालिकेच्या सभागृहात आज महापौर विराजमान होणार आहे.
वसई-विरार शहराला ११५ जनतेचे सेवक मिळाले आहेत. प्रत्येक प्रभागाला विकासाच्या दिशेने नेण्याची जबाबदारी आहे. महापौर, उपमहापौर संपूर्ण शहराची देखभाल करणार असून, विकास योजना, मूलभूत सुविधा आणि प्रगतीची दिशा ठरवली जाणार आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जरी पार पडल्या असल्या तरी अद्याप नगरसेवकांचा शपथविधीसह महापौर, उपमहापौर निवड बाकी आहे.
---------------------------
फोडाफोडीची भीती
बहुजन विकास आघाडीला पालिकेत बहुमत मिळाले आहे, तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरी भाजपने महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. काही दिवसांपूर्वी लोटस ऑपरेशनची चर्चा सुरू होती. महापौर निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण होण्याची भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com