

ठाण्यात माणिक स्वरसंगीत सोहळा
ठाणे (बातमीदार) : पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माणिक स्वर संगीत या शास्त्रीय संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माणिक वर्मा फाउंडेशन, आयटीसी-एसआरए संगीत रिसर्च अकादमी, कोलकाता आणि ठाणे पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम गडकरी रंगायतन येथे होणार आहे. शनिवारी (ता. ७) ८.३० ते ११.३० आणि रविवारी (ता. ८) सकाळी ९.३० ते १२.३० अशा दोन सत्रांत हा कार्यक्रम होईल. आयटीसी-एसआरएचे विद्यार्थी कलाकार मौपाली चौधरी, देबोश्री भट्टाचारजी व श्रेया चॅटर्जी यांच्यासह ओंकार दादरकर, पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे आणि पंडित उल्हास कशाळकर यांचे गायन होणार आहे. याचप्रसंगी पंडित उल्हास कशाळकर यांना माणिक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माणिक वर्मा यांच्या समृद्ध संगीत परंपरेला वाहिलेली ही कृतज्ञ आदरांजली अनुभवण्यासाठी संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.