एक हजार २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी समोर

एक हजार २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी समोर

Published on

एक हजार २०० कोटी रुपयांची फसवणूक
टीडब्ल्यूजे प्रकणात तीन आरोपींना पोलिस कोठडी
सकाळ वृतसेवा
ठाणे, ता. २ : बेकायदेशीर योजनांमध्ये आकर्षक परताव्याचे प्रलोभन दाखवणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीच्या तिघांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात येथून जेरबंद केले. त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुमारे एक हजार १०० गुंतवणूकदारांना एकूण एक हजार २०० कोटी रुपयांची फसवणूक करून त्या रकमेचा अपहार केल्याचे तपासात दिसून येत आहे. त्या तिघांना १० दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून, त्यांच्या चौकशीत आणखी मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
कंपनीच्या संस्थापक संचालक समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर आणि अमित बालम आणि खारघर ब्रांचचे व्यवस्थापक संकेश बाग आणि सागर कदम व कंपनीचे वागळे इस्टेट ब्रांचचे व्यवस्थापक सौरव बाडे यांनी ठाण्यासह संपूर्ण राज्यात एकूण १६ विविध जिल्हयांमध्ये अशा विविध कंपन्या ९ फेब्रुवारी २०२४ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उघडून यामध्ये सुमारे ११ हजार गुंतवणूकदारांना बेकायदेशीर योजनांमध्ये आकर्षक परताव्याचे प्रलोभन दाखवून सुमारे एक हजार २०० कोटी रुपयांचा अपहार केला. श्रीनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात सुरुवातीस तक्रारदारांसह इतर १३ गुंतवणूकदारांनी तीन कोटी ६४ लाख ३७ हजार ५८० इतकी फसवणूक झाल्याचे नमूद केले. या गुन्ह्याच्या तपासात एकूण ३७ गुंतवणूकदार यांची सात कोटी, ९७ हजार ८६९ रुपयांची आरोपींनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण एक हजार २०० कोटी रुपयांची फसवणूक करून गुंतवणूकदारांच्या रकमेचा अपहार केल्याचे प्रथमदर्शन दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्रीनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर गुरुवारी (ता. २९) समीर नार्वेकर, अमित विश्वनाथ बालम या दोघांना तर नेहा नार्वेकर यांना शुक्रवारी (ता. ३०) गुजरात येथे अटक करण्यात आली. या तिघांना शनिवारी (ता. ३१) न्यायालयात हजर केले असता त्यांना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, उर्वरित आरोपींनाही अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी वर्तवला आहे, तर अशा प्रकारे ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कंपनीमार्फत गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com