घोडबंदर रोडवर पकडला दोन किलो २८८.६ ग्रॅम हेरॉईन

घोडबंदर रोडवर पकडला दोन किलो २८८.६ ग्रॅम हेरॉईन

Published on

ठाण्यात सव्वादोन कोटींचे हेरॉइन जप्त
घोडबंदर रोडवर रिक्षाचालक जेरबंद; ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

ठाणे, ता. २ : अमली पदार्थ तस्करीविरोधी मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख परिसरात सापळा रचून ठाणे खंडणी विरोधी पथकाने एका रिक्षाचालकाला अटक केली असून, त्याच्याकडून दोन किलो २८८.६ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे दोन कोटी २५ लाख ९१ हजार ५५० रुपये इतकी आहे.

पालघर जिल्ह्यातील फरदिन गुलजार मुल्ला (५०) हा रिक्षाचालक परराज्यातून हेरॉइन घेऊन विक्रीसाठी गायमुख परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती खंडणी विरोधी पथकाचे हवालदार आशीष ठाकूर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रविवारी (ता. १) गायमुख जकात नाक्याजवळ सापळा रचला. पायी चालत येणाऱ्या संशयित फरदिन मुल्ला याला ताब्यात घेऊन त्याच्या बॅगेची झडती घेतली असता, त्यात सव्वादोन कोटींचे हेरॉइन आढळून आले.

दिवा-खर्डीनंतर मोठी कारवाई
काही दिवसांपूर्वीच दिवा-खर्डी भागात एक किलो ७३६ ग्रॅम हेरॉइन पकडण्यात आले होते. ती घटना ताजी असतानाच पोलिसांनी ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com