डॉ. मेघा परब यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

डॉ. मेघा परब यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
Published on

डॉ. मेघा परब यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

घाटकोपर, ता. २ (बातमीदार) : विक्रोळी येथील विकास हायस्कूलमधील शिक्षिका तथा पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. मेघा परब यांना २०२६च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. बी द चेंज फाउंडेशन यांच्या वतीने शिर्डी, अहिल्यानगर येथील साईपालखी निवारा येथे समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यातील विविध भागांतून केवळ सहा शिक्षकांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये नाशिक, जळगाव विभागातून संदीप अहिरे, वर्धा येथून डॉ. राम सवनेकर, अमरावती येथून अमर वंजारी, पुणे येथून वर्षा राजदेव, छत्रपती संभाजीनगर येथून ज्ञानेश्वर माशालाकर, तर मुंबई, पुणे, कोकण विभागातून डॉ. मेघा परब यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com