सुयश कला क्रीडा मंडळाची २२ वी व्याख्यानमाला

सुयश कला क्रीडा मंडळाची २२ वी व्याख्यानमाला

Published on

सुयश कला-क्रीडा मंडळाची व्याख्यानमाला
ठाणे, ता. २ (बातमीदार) : ठाणे (पूर्व) येथील सुयश कला क्रीडा मंडळ व श्री सिद्धिविनायक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक व्याख्यानमालेत यंदा ठाणेकरांना कलाकार व वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २१ वर्षांपासून ही व्याख्यानमाला सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील दिग्गज वक्त्यांसाठी ओळखली जाते. यंदा २२व्या वर्षी ही तीनदिवसीय व्याख्यानमाला शुक्रवारी (ता. ६) सुरू होणार आहे. या दिवशी आघाडीचे गायक सुदेश भोसले यांच्याशी ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडिलकर मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. शनिवार (ता. ७) ज्येष्ठ गायिका मृदुला दाढे ‘अमरलता’ या व्याख्यानातून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गायकीचे मर्म उलगडतील. रविवारी (ता. ८) शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांच्या शिवचरित्रावरील व्याख्यानाने समारोप होणार आहे. ही व्याख्यानमाला श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पटांगणात सायंकाळी ८ ते १० या वेळेत होणार असून, रसिक ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com