२१७ खेळाडूंसाठी आनंदवार्ता
२१७ खेळाडूंसाठी आनंदवार्ता
रखडलेले क्रीडा अनुदान थेट खात्यावर जमा
विरार, ता. २ (बातमीदार)ः वसई-विरार महापालिकेने ४६ लाख ७० हजार रुपयांचे क्रीडा अनुदान २१७ खेळाडूंच्या खात्यावर जमा केले आहे. या निर्णयामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महापालिकेच्या प्रशासकीय काळात रखडलेले अनुदान मिळावे, यासाठी खेळाडू वारंवार लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होते. मात्र, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर काही खेळाडूंनी माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. या विषयाची गांभीर्याने दखल घेत बहुजन विकास आघाडीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यावर कार्यवाही करताना प्रलंबित क्रीडा अनुदान खेळाडूंच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रातील युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
===========================================
प्रशासकीय राजवटीत अनेक विकासकामे अडकली होती. खेळाडूंचे अनुदान ही रखडले होते. याच अनुषंगाने हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन दिवस पाठपुरावा सुरू होता.
- अजीव पाटील, नगरसेवक, बविआ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

