सर्कस रद्द झाल्याने भूमिपुत्र मैदान खेळाडूंसाठी पुन्हा खुले

सर्कस रद्द झाल्याने भूमिपुत्र मैदान खेळाडूंसाठी पुन्हा खुले
Published on

कळव्यातील भूमिपुत्र मैदानावरील सर्कसचा निर्णय रद्द
संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश, खेळाडूंचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : कळवा येथील खेळाडूंच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या भूमिपुत्र मैदानावर सर्कशीला परवानगी देण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. आमदार संजय केळकर यांनी याप्रकरणी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आक्रमक भूमिका घेतल्याने हे मैदान पुन्हा एकदा मुलांसाठी मोकळे झाले आहे. या निर्णयामुळे कळव्यातील शेकडो खेळाडू आणि स्थानिक नागरिकांनी मैदानात एकत्र येत मोठा जल्लोष केला.
पाच वर्षांपूर्वी अतिक्रमण आणि कचऱ्यामुळे कळव्यातील भूमिपुत्र मैदानाची दुरवस्था झाली होती. भविष्यात तेथे कचऱ्याचे डम्पिंग निर्माण होण्याची भीती स्थानिक व्यक्त करत होते. हे मैदान मोकळे झाल्यास कळव्यातील शेकडो मुलांना, खेळाडूंना हक्काचे मैदान मिळणार होते. आमदार संजय केळकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी लोकचळवळ सुरू केली आणि लोकसहभागाचे आवाहन केले. फोर्टी प्लस टीमचे रणजीत पाटील, अशोक भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह येथील नागरिकांनी प्रतिसाद देत लोकसहभागातून हे मैदान मोकळे करण्यात आले. गेली चार वर्षे सुमारे ५०० विद्यार्थी आणि खेळाडू या मैदानाचा लाभ घेत आहेत.
परंतु भूमिपुत्र मैदान जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याने एका सर्कशीला दोन महिन्यांसाठी वापरण्यासाठी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. ही बाब समजताच स्थानिक आणि खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खेळाच्या मोसमात मैदान दोन महिने बंद राहिल्याने खेळाडूंचे नुकसान होणार होते. नागरिकांनी आणि खेळाडूंनी संजय केळकर यांची भेट घेत हा प्रकार निदर्शनास आणून दिला आणि हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. केळकर यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. हे मैदान लोकसहभागातून आणि चळवळीतून उभे राहिले आहे. त्यामुळे याचा वापर केवळ खेळासाठीच व्हायला हवा, असा आग्रह त्यांनी धरला. अखेर प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि सर्कशीला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली.
ही सर्कस रद्द झाल्याने शेकडो खेळाडूंना हे मैदान पुन्हा मोकळे झाले असून, त्यांनी जल्लोष केला आहे.

मैदान इतर कारणांसाठी वापरू नये
भूमिपुत्र मैदान लोकसहभागातून निर्माण झाले असून, त्याचा वापर खेळासाठी आणि खेळाडूंसाठीच व्हावा, असा आग्रह करण्यात आला होता. यापुढे खेळाशिवाय हे मैदान इतर कारणांसाठी वापरण्यात येऊ नये, अशी सूचनाही प्रशासनाला केल्याचे केळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com