पालघरमध्ये फर्निचर कंपनीला आग
पालघरमध्ये फर्निचर कंपनीला आग
पालघर, ता. २ : येथील शहराला लागून असलेल्या पिडको औद्योगिक वसाहतीमधील ड्युरियन या फर्निचर कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. कंपनीमध्ये असलेल्या लाकूड फर्निचर आणि इतर साहित्याला भीषण आग लागल्याने आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले. पालघरच्या पिडको वजन काट्यासमोर ही नामांकित कंपनी आणि त्याचे गोदाम आहे. येथे मोठ्या प्रमाणात फर्निचर आहे. आज सोमवारी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास ही आग लागल्याचा अंदाज असून, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर पालघर नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचत आग शमविण्याचा प्रयत्न जवानांनी केला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एमआयडीसी, बीएआरसी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. तसेच वसई-विरार महापालिकेचा अग्निशमन बंंबही दाखल झाला होता. कंपनीत एकूण ९६ कामगार काम करीत असून, सर्व सुखरूप आहेत. कोणत्याही कामगाराला इजा झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

