शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण योग कार्यशाळा

शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण योग कार्यशाळा

Published on

शिक्षकांना योगाचे धडे
पेणमध्ये कार्यशाळा

रोहा, ता. ३ (बातमीदार) : शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे, योगाचे धडे देण्यासाठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सावरसई (ता. पेण) येथे सोमवारी (ता. २) विशेष योग कार्यशाळा पार पडली. पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसिद्ध योग प्रशिक्षक डॉ. अशोक भोईर यांनी उपस्थित शिक्षकांना योगाचे महत्त्व, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच दैनंदिन जीवनात योगाचा उपयोग कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. किमान १२ सूर्यनमस्कार नियमितपणे करण्याचा सल्ला देत त्यांनी आरोग्यसंपन्न जीवनशैलीचा संदेश दिला.
कार्यशाळेला सहाय्यक प्रकल्प अधिकारी शशिकांत साबळे, मुख्याध्यापक अजित पवार तसेच विविध आश्रमशाळांतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. उपस्थित शिक्षकांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून योगासने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com