कोकण रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी डीपीआर तयार - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

कोकण रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी डीपीआर तयार - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

Published on

कोकण रेल्वेची क्षमता वाढविणार!
बोगद्याच्या रुंदीकरणासह दुहेरीकरणाचा प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : कोकण रेल्वेमार्गाची प्रवासी व मालवाहतूक क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. तो सध्या मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. त्यात रेल्वे रुळांचे अद्ययावतीकरण, काही बोगद्यांची रुंदी वाढवणे, तसेच निवडक टप्प्यांमध्ये दुहेरीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर कोकण रेल्वेच्या पायाभूत सुधारणा कामांना गती दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली. कोकण रेल्वेमार्गाच्या बळकटीकरणासाठी ही तरतूद पूरक ठरणार आहे. कोकण रेल्वेमार्ग हा पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचा दळणवळण दुवा असून, प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीसाठीही त्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. प्रस्तावित सुधारणा पूर्ण झाल्यास कोकण पट्ट्यातील पर्यटन, व्यापार आणि आर्थिक हालचालींना चालना मिळेल, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला.
---
लोकप्रतिनिधींनी ठाम भूमिका  घ्यावी!
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण, संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरण, प्रवासी भाड्यावरील ४० टक्के अधिभार रद्द करणे तसेच सावंतवाडी टर्मिनस आणि कोचिंग डेपो उभारणीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. खासदारांनी अधिवेशनात याबाबत मागणी करून सरकारचे लक्ष वेधावे, असे आवाहन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केले आहे.
---
कोकण रेल्वेच्या विलीनीकरण, दुहेरीकरण आणि प्रवासी भाड्यावरील अधिभार कमी करण्याबाबत तातडीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. केवळ घोषणा न करता कोकण रेल्वेसाठी स्वतंत्र आणि भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी.
-अक्षय महापदी,  सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com