भिवंडीत मंगळवारी पाणीपुरवठा बंद

भिवंडीत मंगळवारी पाणीपुरवठा बंद

Published on

भिवंडीत मंगळवारी पाणीपुरवठा बंद
भिवंडी, ता. २ (वार्ताहर) : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी तानसा पाइपलाइन येथील टेमघर गोविंदनगर या ठिकाणी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. परिणामी, भिवंडी शहरातील बहुतांश भागात मंगळवारी (ता. ३) पाणीपुरवठा खंडित होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी दिली आहे.
मुंबई पाइपलाइनलगतच्या ताडाळी ते टेमघर या रस्त्याचे काँक्रीटीकरण व तसेच छोट्या पुलाचे काम सुरू आहे. त्यालगत संरक्षक भिंत बनविण्याचे काम सुरू असल्याने तेथे खोदकामादरम्यान पोकलेनमुळे पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. या पाइपलाइनवरून भिवंडी शहराला ३५ एमएलटी पाणीपुरवठा होत असल्याने त्याचा परिणाम मुंबई शहरासोबत भिवंडी शहरातील पाणीपुरवठ्यावरसुद्धा होणार आहे. शहरातील कामतघर, ताडाळी, पद्मानगर, मानसरोवर, धोबी तलाव, सौदागर मोहल्ला, बाजारपेठ, ठाणा रोड यांसह बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर घटनास्थळी मुंबई पालिका पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दाखल होत येथील पाणी उपसा करून दुरुस्ती काम हाती घेतले आहे, अशी माहिती भिवंडी पालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com