महापालिका आयुक्तांच्या आदेशाचे प्रकरण
महापालिका निवडणुका अधिकार क्षेत्रात नाही!
केंद्रीय निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयाला माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्य निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अखत्यारीत येतात. या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची मागणी करण्यासह महापालिका निवडणुकांशी आपला संबंध नाही आणि ते आपले अधिकार क्षेत्रही नाही, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना अपवादात्मक परिस्थितीत आणि संबंधित उच्च न्यायालयाच्या पूर्वपरवानगीनेच निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त केले जाते. हे आदेश संविधानाच्या अनुच्छेद ३२४ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांना लागू होतात, असेही आयोगाने खंडपीठाला सांगितले. आयोगाच्या वतीने वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी आणि अक्षय शिंदे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. या वेळी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश त्यांना बंधनकारक नसल्याचे म्हटल्याची आठवण न्यायालयाने करून दिली. तसेच आयोगाच्या या भूमिकेवर आपण त्या वेळीही आश्चर्य व्यक्त केल्याचेही न्यायालयाने सुनावले. याबाबत कुंभकोणी यांच्याकडे विचारणा केली; परंतु वरिष्ठ वकील उपलब्ध नसल्याने सुनावणीनंतर घेण्याची महापालिकेची विनंती न्यायालयाने मान्य केली आणि सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली.
---
प्रकरण काय?
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आयुक्तांनी कनिष्ठ न्यायालयांच्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. तथापि, उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना निवडणूक कामे लावण्यापासून वगळण्यात आले आहे. या आदेशाबाबत माहिती देऊनही महापालिका आयुक्तांनी न्यायालयीन कर्मचाऱ्यांसंदर्भात आदेश दिलेच कसे, अशी विचारणा करून न्यायालयाने याप्रकरणी स्वत:हून याचिका दाखल केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

