वसईत पाण्याच्या टाकीत सापडला मानवी सांगाडा

वसईत पाण्याच्या टाकीत सापडला मानवी सांगाडा

Published on

वसईत पाण्याच्या टाकीत सापडला मानवी सांगाडा

नालासोपारा, ता. २ (बातमीदार) : वसईत ३० वर्षे जुन्या इमारतीमधील छतावरील एका पाण्याच्या टाकीचे तोडकाम सुरू असताना एक मानवी सांगाडा सापडला आहे. याबाबत माणिकपूर पोलिस ठाण्यात प्राथमिक आकस्मिक मृत्यूची नोंद करून ही हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू आहे.

वसई पश्चिम नवपाडा या परिसरात एक दोन मजल्यांची ३० वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकी आहे. पण ती टाकी अनेक वर्षांपासून विनावापर आहे. शनिवारी (ता. ३१) या टाकीचे तोडकाम सुरू होते. याच वेळी मजुरांना त्या ठिकाणी मानवी कवठी, हाडांचा सापळा असा सांगाडा दिसून आला. तत्काळ याची माहिती माणिकपूर पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तो मानवी सांगाडा ताब्यात घेत जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पाण्याच्या टाकीत हा हाडांचा सांगाडा सापडल्याने सध्या प्राथमिक आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी हत्या की आत्महत्या याचा सर्वांगाने तपास सुरू केला आहे.
--------

शनिवारी सायंकाळच्या सुमारास आम्हाला मानवी सांगाडा सापडल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचे तोडकाम सुरू होते. कपडे, कवठी, हाडे आम्हाला सापडली आहेत. हाडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास सुरू असून, प्राथमिक आम्ही माणिकपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
- उमेश माने-पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त, वसई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com