तीन दिवस धम्माल, मस्ती

तीन दिवस धम्माल, मस्ती
Published on

तीन दिवस धम्माल- मस्ती
सूर्या नदीकाठी रंगणार कासा महोत्सव
कासा, ता. ३ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील आकर्षणाचे केंद्र असलेला तीनदिवसीय कासा महोत्सव ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. यानिमित्ताने भिसे विद्यालयाच्या मैदानावर सध्या जोरदार तयारी सुरू असून तीन दिवस मनोरंजनाची गॅरंटी असणार आहे.
महोत्सवातून स्थानिक कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. नृत्य, नाट्य, गायन, हास्यविनोद कार्यक्रम तसेच स्थानिक यूट्युब कलाकारांचे विशेष सादरीकरण मुख्य आकर्षण आहे. याचबरोबर लिटल चॅम्प्सफेम राधिका पवार, हास्यसम्राट वर्षीत बेराडी, ‘बिग बॉस’फेम दादूस, सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील, सुपरस्टार विजेती गायिका श्रावणी महाजन यांचे रंगतदार कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय पारंपरिक ‘खेळ पैठणीचा’ महिला वर्गासाठीचे विशेष आकर्षण आहे. याचबरोबर शाकाहारी, मांसाहारी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
------------------------
जय्यत तयारी
पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी डॉ. विश्वास वळवी, आमदार विनोद निकोले, माजी आमदार आनंद ठाकूर, पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, तहसीलदार सुनील कोळी, उपविभागीय अधिकारी संदीप महेर, कुंदन संखे, कासा पोलिस अधिकारी अमर पाटील उपस्थित राहणार असून उत्सवामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
---------------------------
स्थानिकांना रोजगार
कासा महोत्सवातून स्थानिक कलाकार, कला आणि खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन दिले जाते. कासा, डहाणू परिसरातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांची ओळख राज्यभर करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो. शिवाय, स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. सध्या मैदानावर जोरदार तयारी असून महालक्ष्मी गडाची प्रतिकृती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे.
-----------------------------
ग्रामीण भागात पर्यटन वाढवणे आणि स्थानिक कलाकारांना हक्काचा मंच उपलब्ध करून देणे, हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. डहाणू तालुक्यातील निसर्गसंपन्न परिसरातील पर्यटनाला चालना देताना स्थानिक खाद्यपदार्थ, कलाकृतींना मोठा फायदा होईल.
- हरेश मुकणे, आयोजक, कासा महोत्सव समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com