

कर संकलनासाठी रणनीती
थकीत मालमत्ताधारकांविरोधात पालिकेची मोहीम
वसई, ता. ३ (बातमीदार)ः वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात विकासाची कामे, नव्या योजना अमलात आणण्यासाठी निधीची गरज असते. त्यामुळे मालमत्ता, पाणीपट्टी, मोबाईल मनोरे, जाहिरात तसेच विकास शुल्क, बाजार कर वसुलीकडे पालिका प्रशासनाने मोर्चा वळवला आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीत १० लाखांहून अधिक रहिवासी आणि वाणिज्य मालमत्ताधारक आहेत तसेच शहरात जाहिरात फलक लावणाऱ्यांचा समावेश आहे. महापालिका अधिकाधिक वसुली करता यावी म्हणून लक्ष केंद्रित करत आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे कर्मचारी व्यस्त होते. त्यामुळे करवसुलीवर परिणाम झाला आहे. सध्या आचोळे ,चंदनसार, वसई, बोळिंज, विरार, वालीव, नवघर-माणिकपूर, पेल्हार, नालासोपारा अशा नऊ प्रभाग समितीमध्ये देयके अदा करून स्मरणपत्र तसेच घरोघरी, औद्योगिक वसाहतीत करभरणासाठी आवाहन केले जात आहे.
----------------------------
मालमत्तांचा लिलाव करणार
- पालिकेने २०२३-२४ आर्थिक वर्षात ३४६ कोटी, तर २०२४-२५ या वर्षात ३९० कोटी इतकी वसुली केली होती. एकीकडे विकासात्मक कामांसाठी निधीची गरज निर्माण होत असते. मात्र, बडे थकबाकीदार कर भरत नसल्याने थेट परिणाम शहराच्या विकासकामांवर होत असतो.
- वसई-विरार शहर पालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाकडून वसुलीचा दैनंदिन आढावा घेण्यास सुरुवात केली असून, थकबाकीधारकांची यादी तयार करणे, त्यानंतर मालमत्ता सील करणे तसेच लिलाव पद्धतीचा वापर करणे, अशा प्रक्रियांना वेग येणार आहे.
-------------
२८८ करवसुली
वसई-विरार महापालिकेने या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत एकूण २८८ कोटींची करवसुली मालमत्ता कर संकलन विभागाकडून करण्यात आली असून, येत्या चार महिन्यांत अधिकाधिक कर वसूल करता यावा, यासाठी नऊ प्रभागांत अधिकारी, कर्मचारी कामाला लागणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.