भाताच्या विक्रीचा डाव फसला

भाताच्या विक्रीचा डाव फसला

Published on

भाताच्या विक्रीचा डाव फसला
कासा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा
कासा, ता.३ (बातमीदार) ः आदिवासी शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवण्यात येणाऱ्या केंद्र सरकारच्या आधारभूत धान (भात) खरेदी योजनेत गंभीर गैरव्यवहार उघडकीस आला आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कार्यरत सवादे येथील आधारभूत धान खरेदी केंद्रातून खरेदी केलेल्या धानाचा अपहार केल्याप्रकरणी तिघांविरोधात कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सवादे येथील शासकीय गोदामात साठवलेले धान भरडाईसाठी वसई (भिणार) येथील सद्गुरुकृपा राईस मिल येथे पाठविण्याचा ठेका देण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी टेम्पो क्रमांक एमएच ४८ सीक्यू ६८३९ मध्ये ३१५ बारदाना (पोती) धान भरल्याची नोंद होती, तर दुसऱ्या टेम्पो क्रमांक एमएच ४८ सीक्यू १५०६ मध्ये ३२५ बारदाना धान दाखवण्यात आले होते. या दोन्ही वाहनांतील धानाचे १२६ क्विंटल असून अंदाजे किंमत ५ लाख ९३ हजार रुपये इतकी असल्याचे नोंदीत नमूद आहे. हे धान वसईकडे भरडाईसाठी जात असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात संबंधित वाहने गुजरात राज्याच्या दिशेने जात असल्याची माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ जव्हार येथील आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक योगेश सुदाम पाटील यांच्याकडे तक्रार केली. यावेळी दोन्ही टेम्पो चालकांची चौकशी केली असता कागदपत्रे भिणार येथील राईस मिलची असली तरी प्रत्यक्षात माल गुजरातमध्ये नेत असल्याचे उघड झाले.
-------------------------------
तिघांना पोलिस कोठडी
या प्रकरणात टेम्पो चालक अस्वद अजिजुरेहमान सिद्दीकी (वय २३) व साहिद अजिजुरेहमान सिद्दीकी तसेच राईस मिल मालक वसंत आनंद पाटील यांना अटक करण्यात आली आहे. रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या शासकीय योजनेतच असा प्रकार घडल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com