बँकेत कर्मचारी वेतनवाढ निश्चित

बँकेत कर्मचारी वेतनवाढ निश्चित

Published on

बँकेत कर्मचारी वेतनवाढ निश्चित
विरार (बातमीदार) : वसई विकास सहकारी बँक लिमिटेड या सहकारी बँक कर्मचाऱ्यांची २२ महिन्यांपासून प्रलंबित असलेली वेतनवाढ नुकतीच निश्चित करण्यात आली. या कराराअंतर्गत कर्मचाऱ्यांना भरघोस वाढ व इतर सवलती मिळणार असल्याचे बँक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, कराराच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या करारावेळी बँकेच्या वतीने अध्यक्ष आशय राऊत, उपाध्यक्ष शिरीष राऊत, सीईओ दिलीप ठाकूर, ज्येष्ठ संचालक महेश म्हात्रे यांच्यासह इतर संचालकांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस प्रदीप पाटील, संघटक सचिव प्रशांत ठाकूर, कर्मचारी प्रतिनिधी संदीप म्हात्रे व इतर पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर कराराची प्रत आदान प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करताना संघटक सचिव प्रशांत ठाकुर यांनी आजचा वेतनवाढ करार हा अपेक्षापूर्ती करार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com