रेल्वे अपयशाचा भार नोकरदारांवर
‘उशीर समजून घ्या’
रेल्वेच्या लेटमार्कमुळे चाकरमान्यांच्या नोकऱ्या धोक्यात; प्रवासी संघटना आक्रमक
बदलापूर, ता. ३ (बातमीदार) ः कसारा आणि कर्जत मार्गावरील लोकल रेल्वे सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने हजारो नोकरदार प्रवाशांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असून काही कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरळीत होईपर्यंत कसारा व कर्जत रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उशीर प्रशासन व कंपनी व्यवस्थापनांनी समजून घ्यावा, अशी मागणी कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.
गाव-खेड्यांचे शहरात रूपांतर झाल्याने प्रवासीसंख्या झपाट्याने वाढली आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होत असताना लोकल ट्रेनची संख्या मात्र त्या प्रमाणात वाढलेली नाही. परिणामी, मुंबई डिव्हिजनमध्ये दररोज १३ ते १४ प्रवाशांचा मृत्यू होत असून २० ते २५ प्रवासी अपघातात गंभीर जखमी किंवा अपंग होत असल्याची बाब समोर आली आहे. कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना व उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते दिल्लीतील रेल्वे बोर्ड व रेल्वेमंत्र्यांपर्यंत सातत्याने पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी व्यक्त केली. पुढील काही महिन्यांत लोकल सेवा वेळेवर होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या उशिराकडे सहानुभूतीने पाहावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

