महिलांसाठी प्रेरणादायी सन्मान सोहळ्याचे आयोजन

महिलांसाठी प्रेरणादायी सन्मान सोहळ्याचे आयोजन

Published on

महिलांसाठी प्रेरणादायी सन्मान सोहळ्याचे आयोजन
मुलुंड, ता. ३ (बातमीदार) ः “सन्मान महिलांचा, आदर नारीशक्तीचा” या प्रेरणादायी घोषवाक्याअंतर्गत शिक्षक नेते प्रा. डॉ. विशाल कडणे व मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जानेवारी रोजी भांडुप येथे महिला शिक्षकांसाठी विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात निष्ठा, जिद्द व समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या महिला शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रा. डॉ. विशाल कडणे यांनी सांगितले.
भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमास मुंबईतील विविध शाळांमधील महिला शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या उपक्रमासाठी आमदार अमित साटम यांचे मार्गदर्शन लाभल्याबद्दल उपस्थित शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. तसेच सिद्धिविनायक न्यासाचे कोषाध्यक्ष व मुंबई भाजपा महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी आणि किरण शेलार यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे आयोजकांनी नमूद केले. या सन्मान सोहळ्यात मुंबईतील नामांकित शाळांमधील २५ महिला मुख्याध्यापिका तसेच सुमारे ३०० महिला शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महिलांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका, त्यांचे शैक्षणिक योगदान व समाजनिर्मितीतील कार्य अधोरेखित करणे हा या सोहळ्याचा हेतू होता. सायंकाळी ५ वाजता मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय निकम यांनी उपस्थित राहून महिला शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला. कार्यक्रमात पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले असून, महिला शिक्षकांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या वेळी उपस्थित मान्यवरांसह सर्व महिला मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक व शिक्षिकांना प्रा. डॉ. विशाल कडणे यांच्या वतीने विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. महिला शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांच्या योगदानाची दखल घेणे व समाजात नारीशक्तीप्रती आदरभाव वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com