जय श्रीराम, जय द्वारकाधीशचा नारा

जय श्रीराम, जय द्वारकाधीशचा नारा

Published on

‘जय श्रीराम, जय द्वारकाधीश’चा नारा
वसई, ता. ३ (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेच्या महापौरपदाच्या निवड प्रक्रियेवेळी भाजपकडून ‘जय श्रीराम’चा नारा लावण्यात आला. त्याला प्रतिउत्तर देताना बविआच्या नगरसेवकांनी ‘जय द्वारकाधीश’चा गजर केल्याने काहीवेळेसाठी वातावरण बदलल्याचे दिसून आले. महापौर, उपमहापौर पदाची निवड झाल्यानंतर बविआ कार्यकर्त्यांनी पालिकेच्या आवारातच जल्लोष केला. या वेळी भाजपचे नगरसेवक बाहेर पडताच बहुजन विकास आघाडीचा विजय असो, हितेंद्र ठाकूर यांचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या वेळी महापौरपदी अजीव पाटील, उपमहापौरपदी मार्शल लोपीस यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com