आठवडे बाजाराविरोधात नागरिकांचा पुढाकार

आठवडे बाजाराविरोधात नागरिकांचा पुढाकार

Published on

जुईनगर, ता. ३ (बातमीदार) : बेलापूर आणि घणसोली येथील आठवडा बाजारानंतर आता नेरूळ येथील बाजारदेखील महापालिकेच्या रडारवर आल्याची माहिती समोर येत आहे. नेरूळ परिसरातील काही जागरूक नागरिकांनी आठवडा बाजारातील गोंधळ आणि बेशिस्त कारभाराची व्हिडिओ शूटिंग करून ती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्याने हा प्रकार प्रकाशझोतात आला आहे.

नेरूळ येथील गावदेवी चौक परिसरात दर आठवड्याला भरवण्यात येणाऱ्या बाजारामुळे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या चौकातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर फेरीवाले बिनधास्तपणे आपले व्यवसाय लावत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळेत या परिसरात प्रचंड कोंडी होत असून, नागरिक वैतागले आहेत. रस्त्यावर अतिक्रमण करून वस्तूंचा व्यापार केला जात असून, पादचाऱ्यांसाठीदेखील सुरक्षित मार्ग उपलब्ध राहत नाही. या ठिकाणाहून जाणारी वाहने, बस आणि रुग्णवाहिकांनादेखील या कोंडीत अडकावे लागत असल्याचे चित्र आहे. प्रकाशित झालेल्या व्हिडिओनंतर महापालिका प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले असून, लवकरच कारवाई केली जाईल, अशी चर्चा आहे.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आठवडा बाजाराचे नियोजन करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे, तर महापालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग यावर काय भूमिका घेते आणि प्रत्यक्ष कारवाई केव्हा होते, याकडे आता नेरूळकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com