अंबरनाथमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ''ट्रॅफिक वॉर्डन'' ची संकल्पना !

अंबरनाथमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ''ट्रॅफिक वॉर्डन'' ची संकल्पना !

Published on

अंबरनाथमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘ट्रॅफिक वॉर्डन’ची संकल्पना
​अंबरनाथ, ता. ३ (वार्ताहर) ः शहरात सातत्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येमुळे निर्माण होणारी भीषण वाहतूक कोंडी तसेच अपघातांचा वाढता धोका लक्षात घेता, प्रमुख चौकांमध्ये ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरसेवक मनीष गुंजाळ यांनी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांना लेखी निवेदन दिले असून, नगराध्यक्षांनी यावर लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
​अंबरनाथ शहरातील शहरीकरण वेगाने होत असल्यामुळे कल्याण-कर्जत राज्यमार्ग, मटका चौक ते महात्मा गांधी चौक, वैभव हॉटेल परिसर, सुदामा हॉटेल टी-पॉइंट, रेल्वे स्टेशन परिसर, फॉरेस्ट नाका आणि स्वामी समर्थ चौक यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी दररोज वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने या कोंडीचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना बसत आहे. रस्ता ओलांडताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
​अंबरनाथ हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, येथे वारंवार मान्यवरांची आणि पर्यटकांची ये-जा असते. अशा परिस्थितीत शहराची वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि सुरळीत असणे अत्यंत आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांना सहाय्य करण्यासाठी पालिकेमार्फत प्रशिक्षित ट्रॅफिक वॉर्डन नेमल्यास प्रमुख चौकांमधील ताण कमी होईल आणि नागरिकांचा प्रवास सुखकर होईल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या जनहिताच्या मागणीची दखल घेत नगराध्यक्षांनी तातडीने पावले उचलण्याचे संकेत दिल्याने अंबरनाथकरांना वाहतूक कोंडीतून लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

नोट :- सोबत फोटो जोडलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com