कचरा नेणाऱ्या ट्रकला अपघात; चालक जखमी
कचरा नेणाऱ्या ट्रकला अपघात; चालक जखमी
ठाणे, ता. ३ (बातमीदार) : डेब्रिज व कचरा घेऊन मुंब्रा येथे निघालेल्या ट्रकने एका अनोळखी वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कळवा, रेतीबंदर रोडवरील खारेगाव टोलनाक्याच्या पुढे घडली. या अपघातात ट्रकमध्ये अडकलेला ट्रकचालक राजकुमार (३५) याला सुखरूप बाहेर काढून त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तसेच अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात आला.
कळवा, खारेगाव टोलनाक्याच्या पुढे एक अपघात होऊन ट्रकचालक जखमी झाला असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला प्राप्त झाली होती. ही माहिती मिळताच कळवा पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्षेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी तातडीने धाव घेतली. घटनास्थळी ट्रकमध्ये अडकलेला चालक राजकुमार याला बाहेर काढून महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात चालकाच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. हा ट्रक रूपेश तळवर यांच्या मालकीचा आहे. त्यावर चालक असलेला राजकुमार हा मुलंड डम्पिंग येथून डेब्रिज व कचरा घेऊन मुंब्राच्या दिशेने निघाला होता. त्या वेळी त्याने एका वाहनाला जोरदार धडक दिली. ज्यात ट्रकचा पुढच्या भाग अपघातग्रस्त झाला. हा अपघात सकाळच्या सत्रात झाल्याने येथे जास्त गाड्या नव्हत्या, पण थोड्या वेळाने होणारी वाहतूक कोंडी पाहता वाहतूक पोलिसांनी तातडीने तो ट्रक रस्त्याच्या बाजूला नेला. ज्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला अशी माहिती महापालिका आपत्ती व्यवस्थान अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

