मतदानासाठी राजिप शाळांची डागडुजी

मतदानासाठी राजिप शाळांची डागडुजी

Published on

मतदानासाठी राजिप शाळांची डागडुजी
आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी लगबग

अलिबाग, ता. ३ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गटांतील आणि पंचायत समितीच्या ११८ गणांतील मतदारसंघात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ठिकठिकाणी प्रचाराला वेग आला आहे. येत्या ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. २,३२३ मतदान केंद्रांत मतदान होणार आहे. त्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या बंद झालेल्या शाळांचा समावेश आहे. त्यामुळे मतदानासाठी गेल्या अनेक दिवसांपासून या शाळांच्या डागडुजीसह रंगरंगोटी व अन्य सुविधा उपलब्ध करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत या शाळांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
जिल्हा परिषदेच्या सुमारे अडीच हजारांहून अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे ९६ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील सहा वर्षांपूर्वी शासनाने पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या ३०४ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या शाळांतील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत पाठविण्यात आले. त्यामुळे शाळेच्या परिसरात गवत वाढू लागणे, भिंतींना तडे पडणे, भिंतींवरील रंग उडणे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मतदान केंद्र सुसज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे बंद पडलेल्या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग कामाला लागले आहे. बंद पडलेल्या शाळांमधील परिसर स्वच्छ करण्याबरोबरच उभारण्यात येणाऱ्या मतदान केंद्रांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी तयारी सुरू केली आहे. या शाळांमध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृह अशा सुविधा उपलब्ध करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस असणार आहेत. रांगेत उभे राहून मतदान करण्यासाठी केंद्रात येण्याची व्यवस्था असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com