अखेर मिरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचा महापौर

अखेर मिरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचा महापौर

Published on

अखेर मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता
भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता, तर उपमहापौरपदी भाजपचेच ध्रुवकिशोर पाटील यांची निवड झाली. अपेक्षेप्रमाणे भाजपने दोन्ही पदांवर विजय मिळवत विरोधी उमेदवारांचा ७९ विरुद्ध १६ मतांनी दणदणीत पराभव केला.
भाईंदर येथे आज सकाळी ११ वाजता महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. महापौरपदासाठी भाजपच्या डिंपल मेहता आणि मिरा-भाईंदर शहर विकास आघाडीच्या काँग्रेसच्या रुबिना शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्जांची छाननी केल्यानंतर दोन्ही अर्ज वैध ठरवण्यात आले. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला; मात्र कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने थेट मतदान प्रक्रिया पार पडली.
यात डिंपल मेहता यांनी ७९ विरुद्ध १६ मतांनी विजय मिळवला. यानंतर उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे ध्रुवकिशोर पाटील यांनी विकास आघाडीच्या वंदना पाटील यांचा ७९ विरुद्ध १६ मतांनी पराभव केला. निवडणूक निकाल जाहीर होताच पीठासीन अधिकारी सौरभ कटियार आणि महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आमदार नरेंद्र मेहता संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. निवडणूक संपल्यानंतर त्यांनी सभागृहात जाऊन विजेत्यांचे अभिनंदन केले.
------
गेल्या साडेतीन वर्षांच्या महापालिकेतील प्रशासकीय काळात अनेक विकासकामे रखडली आहेत. विशेषकरून सूर्या पाणी योजना, मेट्रो, काँक्रीट रस्ते या कामांना आता प्राधान्याने गती दिली जाईल. मीदेखील महाराष्ट्राचीच मुलगी असून, माझा जन्म मुंबईतच झाला आहे; मात्र मराठी-अमराठी या वादापेक्षाही काम करण्यावर आपला अधिक विश्वास आहे.
- डिंपल मेहता, नवनिर्वाचित महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com