एकदरा समुद्रकिनारी आगळीवेगळी मासेमारी स्पर्धा
एकदरा समुद्रकिनारी आगळीवेगळी मासेमारी स्पर्धा
१०० स्पर्धकांचा सहभाग; धीरज पाटील अव्वल
मुरुड, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई येथील न्यू बॉम्बे अँगलर संस्थेच्या विद्यमाने मुरूडनजीकच्या एकदराजवळील गायमुख समुद्रकिनारी आगळीवेगळी मासेमारी स्पर्धा पार पडली. सहाव्यांदा भरवण्यात आलेल्या या स्पर्धेत १०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेत धीरज पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अविनाश मुकादम आणि प्रसाद भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन केले होते.
फिशिंग स्पर्धा आयोजनासाठी एकदराचे सरपंच यांचे सहकार्य लाभले. गायमुख परिसरात पर्यटन विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. पूर्ण किनाऱ्यावर सुसज्ज बंधारा व रस्ता करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
स्पर्धेबाबत अविनाश मुकादम म्हणाले की, मुरूड शहराचा समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे. त्यात एकदरा गावच्या मागे असणारा गायमुख परिसर मासेमारीसाठी उत्तम असून, शांत समुद्राच्या लाटांसोबत येणारा गार वारा अनुभवत मन एकाग्र करून मासेमारी करण्याचा आनंद काही वेगळाच असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी संस्थेचे कल्पेश धुमाळ, नदीम शेख, प्रशांत रानकर, अक्षय दांडेकर, गणेश कोळी, अजय म्हात्रे, हर्षद मळेकर, संकेत पाटील, गणेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेचे निकष
स्पर्धेत सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत समुद्रावर ठरवून दिलेल्या जागेवर फिशिंग रॉडने मासेमारी करण्यात आली. ज्याला सर्वात मोठा व जास्त वजनाचा मासा मिळेल तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणार होता. स्पर्धेत धीरज पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावत ५० हजारांचे पारितोषिक मिळवले. अतुल तडकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना २५ हजारांचे बक्षीस मिळाले. तसेच तृतीय क्रमांक सचिन सुईने पटकावला. त्यांना १५ हजारांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
फोटो - 593
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

