‘मराठी महापौर’चा मोर्चा निघू शकला नाही

‘मराठी महापौर’चा मोर्चा निघू शकला नाही

Published on

‘मराठी महापौर’चा मोर्चा निघू शकला नाही
पोलिसांचा कडक बंदोबस्त

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमध्ये मराठी महापौराच्या मागणीसाठी मराठी एकीकरण समिती आणि मनसेच्या वतीने मंगळवारी (ता. ३) काढण्यात येणारा मराठी मोर्चा कडक पोलिस बंदोबस्तामुळे प्रत्यक्षात निघू शकला नाही. हा मोर्चा नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानातून सुरू होणार होता; मात्र काही महिन्यांपूर्वी मिरा रोड येथे झालेल्या मराठी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत पोलिसांनी सकाळपासूनच महापालिका आणि मैदान परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता.
महापालिका परिसरात ओळखपत्र किंवा अधिकृत परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. निवडणुकीसाठी आलेल्या नगरसेवकांनाही ओळख पटवूनच आत प्रवेश देण्यात आला. भाजपच्या सर्व नगरसेवकांना सोमवारी रात्री मिरा रोड येथील पंचतारांकित सेव्हन इलेव्हन क्लबमध्ये ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता दोन वातानुकूलित बसमधून त्यांना महापालिकेत आणण्यात आले. सर्व नगरसेवकांनी भगवे फेटे परिधान केले होते आणि सभागृहात पोहोचेपर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांकडून विशेष काळजी घेण्यात आली.
...
कार्यकर्ते जमले पण...
मोर्चासाठी कार्यकर्ते मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ जमा झाले होते; मात्र पोलिसांनी संरक्षक कठडे उभे करून मोर्चा निघणार नाही, याची खबरदारी घेतली. अपेक्षित संख्येने कार्यकर्ते न जमल्याने मोर्चा प्रत्यक्षात निघू शकला नाही. पोलिसांकडून मोर्चा रोखण्यात आल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. काही कार्यकर्ते आक्रमक होत पोलिसांशी झटापटीवर उतरले. काहींनी संरक्षक कठडे पाडण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना अडवले. अखेर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलकांनी त्यांना निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
...
मराठी महापौराच्या मागणीवरून विनाकारण वाद ः सरनाईक
ठाणे, ता. ३ : मिरा-भाईंदर महापालिकेत मराठी महापौर व्हावा, या मागणीवरून मराठी एकीकरण समिती विनाकारण वाद निर्माण करीत असल्याचा आरोप राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी केला. मिरा-भाईंदरमध्ये सुमारे ८२ टक्के हिंदी भाषिक आणि १८ टक्के मराठी भाषिक नागरिक वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत मराठी महापौराची मागणी करून समिती वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. केवळ एका विशिष्ट पक्षाला राजकीय फायदा मिळावा, यासाठी मराठी एकीकरण समिती कार्यरत असून, महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मराठी उमेदवारांविरोधात उमेदवार उभे करण्यात आल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com