महागडी दुचाकी चोरीप्रकरणी सराईत चोर अटकेत
महागडी दुचाकी चोरीप्रकरणी सराईत चोर अटकेत
चेंबूर, ता. ३ (बातमीदार) : चेंबूर येथील टिळकनगर परिसरासह मुंबईतून महागड्या दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. सुनील चौधरी (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कुर्ला परिसरात राहणारे फिर्यादी संदीप सोनकर यांनी २१ जानेवारी रोजी चेंबूर येथील टिळकनगर परिसरात आपली महागडी बुलेट दुचाकी उभी केली होती. काही वेळाने कामावरून परतल्यानंतर दुचाकी घटनास्थळी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती दुचाकी घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान सुनील चौधरी हा बदलापूर येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बदलापूर परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने सदर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिस तपासात सुनील चौधरी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच अन्य पोलिस ठाण्यांमध्ये २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास टिळकनगर पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

