पाच महापालिकांचे महापौर अखेर ठरले!

पाच महापालिकांचे महापौर अखेर ठरले!

Published on

पाच महापालिकांचे महापौर अखेर ठरले!
चार ठिकाणी महिला विराजमान

मुंबई, ता. ३ ः महामुंबईतील विविध महापालिकांमध्ये आज महापौरांची निवड करण्यात आली. अनेक दिवस सुरू असलेल्या महापौर कोण होणार, या चर्चेला त्यामुळे या पाच महापालिका क्षेत्रांत आता पूर्णविराम मिळाला आहे. पाचपैकी चार महापालिकांमध्ये महिला महापौर विराजमान झाल्या आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई- विरार या पाच महापालिकांत महापौरपदासोबतच उपमहापौरपदांवरही निवड करण्यात आली. तीन ठिकाणी शिंदे गटाचे, एका ठिकाणी भाजपचा, तर एका ठिकाणी बविआचा महापौर झाला.
...
कोठे, कोण, कोणत्या पदावर?

ठाणे महापालिका
महापौर : शर्मिला पिंपळोलकर (शिवसेना शिंदे गट)
उपमहापौर : कृष्णा पाटील (भाजप)
...
कल्याण-डोंबिवली महापालिका
महापौर : ॲड. हर्षाली थविल-चौधरी (शिवसेना शिंदे गट)
उपमहापौर : राहुल दामले (भाजप)
...
उल्हासनगर महापालिका
महापौर : अश्विनी कमलेश निकम (शिवसेना शिंदे गट)
उपमहापौर : अमर लुंड (भाजप)
...
मिरा-भाईंदर महापालिका
महापौर : डिंपल मेहता (भाजप)
उपमहापौर : ध्रुवकिशोर पाटील (भाजप)
...
वसई-विरार महापालिका
महापौर : अजीव पाटील (बहुजन विकास आघाडी)
उपमहापौर : मार्शल लोपीस (बहुजन विकास आघाडी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com