म्हाडाचा सोमवारी लोकशाही दिन
म्हाडाचा सोमवारी लोकशाही दिन
मुंबई, ता. ३ : म्हाडा पंधरावा लोकशाही दिन सोमवारी (ता. ९) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात दुपारी १२ वाजल्यापासून हा उपक्रम होणार आहे.
लोकशाही दिनांतर्गत नागरिकांच्या प्राप्त तक्रारी अर्जांवर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खुली चर्चा केली जाते. यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात आली असून नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि त्वरित न्याय मिळत आहे. या उपक्रमामुळे म्हाडा प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी व नागरिकांप्रति संवेदनशील बनले असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करून घ्यावे, असे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले आहे. लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी तक्रार अर्ज विहित नमुन्यात असावा. म्हाडा लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात १५ दिवस अगोदर दोन प्रतींत पाठविणे आवश्यक आहे. हा नमुना अर्ज म्हाडाच्या https://mhada.gov.in संकेतस्थळावर लोकशाही दिन या सदरात उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

