रब्बी हंगामासाठी बळीराजा सज्ज
रब्बी हंगामासाठी बळीराजा सज्ज
विक्रमगड तालुक्यात ५७० हेक्टर क्षेत्रात गवारीची लागवड
विक्रमगड, ता. ३ (बातमीदार)ः तालुक्यातील ग्रामीण भागात रब्बी हंगामात कडधान्य, गळीत धान्य, भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सध्या ही पिके जोमात वाढत आहेत. अनेक पिकांना फळधारणा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, पण पक्ष्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे चिंतेचे वातावरण आहे.
विक्रमगड तालुक्यात रब्बी कडधान्य १,०२३ हेक्टर, गळीत धान्य १०१ हेक्टर आणि एकूण रब्बी हंगामाची पेरणी १,१२४ हेक्टर क्षेत्रात झाली आहे. विशेष म्हणजे, या तालुक्यात ६१९ हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची लागवड करण्यात आली असून, विक्रमगड महसूल मंडळात ७० हेक्टर, तलवाडा महसूल मंडळात २० हेक्टर क्षेत्रात तर यात सर्वाधिक गवारीची लागवड ही चिंचघर महसूल मंडळात ४८० हेक्टर क्षेत्रात केली आहे. एकूणच विक्रमगड तालुक्यातील गवारीची लागवड एकूण ५७० हेक्टर क्षेत्रात झाली असून, हा पालघर जिल्ह्यातील लक्षणीय आकडा मानला जात आहे. काकडी, चवळी, वांगी, कलिंगड, टोमॅटो यांसारख्या भाजीपाला पिकांवर सध्या फळधारणा सुरू आहे. मात्र, पक्षी फळांवर चोच मारून नुकसान करत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
--------------------------
पिकांच्या रक्षणासाठीचा संघर्ष
- भाजीपाल्याला बाजारात चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा असताना पक्ष्यांमुळे होणारे नुकसान आर्थिक तोट्यात भर घालणारे ठरत आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पीक संरक्षणाबाबत मार्गदर्शन व तांत्रिक माहिती दिली जात आहे.
- शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरजही व्यक्त होत आहे. सध्या शेताशेतांत उभ्या असलेल्या बुजगावण्यांचे दृश्य शेतकऱ्यांची मेहनत, पिकांच्या रक्षणासाठीचा संघर्ष अधोरेखित करत आहे.
-------------------------
भाजीपाला पिकामध्ये फळे लागणी काळात पक्षी पिकांची नासधूस करत आहेत. त्यामुळे कोवळ्या पिकांची राखण करावी लागते. रात्रीच्या सुमारास या पिकांचे संरक्षण व्हावे, याकरिता शेतकरी बुजगावणे लावून पिकांचे संरक्षण करावे लागत आहे.
- अनिल जाधव, शेतकरी, म्हसरोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

