राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा

Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा
मुंबई, ता. ३ : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी ११ फेब्रुवारीला निवडणूक होणार असून, येत्या शनिवारी (ता. ७) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेता येतील. ही निवडणूक आवाजी पद्धतीने हात उंचावून केली जाणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे कामकाज पाहतील. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तीन नगरसेवकांनी शिवसेनेला (शिंदे गट) पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची सदस्यसंख्या ३२ वर जाणार आहे. दुसरीकडे महायुतीची नगरसेवक संख्याही १२१ वर पोहोचणार आहे. सोमवारी भाजप व शिवसेनेने कोकण आयुक्त कार्यालयात गटनोंदणी केल्यानंतर महापौर निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ८९ तर शिवसेना (शिंदे) २९ असे मिळून ११८ नगरसेवक निवडून आल्याने महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होणार, हे निश्चित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com