नवी मुंबई महानगरपालिका मालमत्ता कर वसुली
नवी मुंबई महापालिकेची ६२६ कोटी मालमत्ता करवसुली
वाशी, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करवसुलीसाठी पालिका प्रशासन सध्या अॅक्शन मोडमध्ये आले आहे. मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, थकीत कर न भरलेल्या मालमत्तांवर थेट जप्तीची कारवाई केली जात आहे. आतापर्यंत पालिकेने ६२६ कोटी रुपयांची मालमत्ता करवसुली केली असून, ३८ थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्यात आली आहे. यंदा एक हजार कोटी रुपयांची करवसुली करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले असून, हे उद्दिष्ट गाठले जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात पालिकेने ८२६ कोटी रुपयांची मालमत्ता करवसुली केली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा हा आकडा नक्कीच पार केला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी मार्चअखेरीस पालिका मालमत्ता करांसाठी अभय योजना जाहीर करते. यंदादेखील ही योजना लागू होणार का, याकडे थकीत मालमत्ताधारकांचे लक्ष आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाकडून ही कारवाई सुरू आहे. वारंवार नोटिसा देऊनही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर कोणतीही सूट न देता कठोर कारवाई केली जात आहे. यासाठी स्वतंत्र जप्ती पथक स्थापन करण्यात आले असून, शहरातील सर्व विभागीय कार्यालयांमार्फत ही मोहीम राबवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

