टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर , 
११.२८ टक्केच उमेदवार पात्र

टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर , ११.२८ टक्केच उमेदवार पात्र

Published on

महाटीईटीचा निकाल
केवळ ११.२८ टक्के!
३.९६ लाख उमेदवार नापास
मुंबई, ता. ३ ः राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये शिक्षकभरतीसाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (महा-टीईटी) निकाल राज्य परीक्षा परिषदेने आज जाहीर केला. यातील दोन्ही पेपरला बसलेल्या एकूण चार लाख ४६ हजार ७३० उमेदवारांपैकी केवळ ५० हजार ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले. तब्बल ३ लाख ९६ हजार ३२५ उमेदवार नापास झाल्याने या परीक्षेचा निकाल केवळ ११.२८ टक्के इतकाच लागला आहे.
राज्यभरात २३ नोव्हेंबर २०२५ रोजी महाटीईटीची परीक्षा राज्यभरात पार पडली होती. या परीक्षेची अंतिम सूची १२ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आल्यानंतर आज हा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. पेपर-१ आणि पेपर-२ या दोन्ही पेपरसाठी एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यातील तब्बल ३ लाख ९६ हजार ३२५ उमेदवार नापास झाले. सुमारे २८ हजार ९३९ जणांनी या परीक्षेला दांडी मारली आहे.
महाटीईटीच्या पेपर-१ साठी दोन लाख ३ हजार ३३४ नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी एक लाख ९० हजार ९०१ उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यातील केवळ २१ हजार ८९२ जण पात्र ठरले, तर एक लाख ६८ हजार ९९३ उमेदवार नापास झाले या पेपरचा एकूण निकाल हा ११.४७ इतका लागला आहे. पेपर-२ साठी दोन लाख ७२ हजार ३३२ जणांनी नोंदणी केली होती, त्यापैकी दोन लाख ५५ हजार ८९२ जण परीक्षेला बसले होते. त्यातील केवळ २८ हजार ४७७ जण या परीक्षेत पात्र ठरले, तर तब्बल दोन लाख ७२ हजार ३३२ जण नापास झाले. या पेपरचा निकाल ११.१३ टक्के आहे.
--
३६ जणांचे निकाल राखीव
महाटीईटीच्या पेपर-१ मध्ये १६ उमेदवाराचे, तर पेपर-२ मध्ये २०, अशा एकूण ३६ उमेदवारांची निकाल काही तांत्रिक कारणामुळे राखीव ठेवण्यात आला आहेत.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com