वंदे भारत कोस्टल सायक्लोथॉन'' १० फेब्रुवारीला नायगावात
वंदे भारत कोस्टल सायक्लोथॉनची उत्सुकता
नायगावात १० फेब्रुवारीला दाखल होणार, स्वागताची जय्यत तयारी
विरार, ता. ४ (बातमीदार) ः भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीने होणारी वंदे भारत कोस्टल सायक्लोथॉन २०२६ मोहीम १० फेब्रुवारीला जूचंद्र चंद्रपाडा वाकीपाडा-बापाणे येथे दाखल होत आहे. यानिमित्ताने जूचंद्र ग्रामदेवी न्यासाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.
भारत सरकारच्या विविध प्रशासकीय व शासकीय अधिकाऱ्यांचा या मोहिमेत सक्रिय सहभाग आहे. देशाच्या सागरी सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे, या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या राष्ट्रीय सायक्लोथॉन मोहीम मंगळवारी (ता. १०) सायंकाळी ४ वाजता स्वातंत्र्यसैनिक, कलावंतांची परंपरा लाभलेल्या जूचंद्र गावासह चंद्रपाडा, वाकीपाडा, बापाणे गावांमध्ये आगमन होणार आहे. यानिमित्ताने श्री चंडिका देवी मंदिराच्या प्रांगणात विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, लोकनृत्य व पारंपरिक सांस्कृतिक सादरीकरण केले जाणार आहे. या माध्यमातून राष्ट्रप्रेम, सागरी सुरक्षेचे महत्त्व, एकात्मतेची भावना रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
----------------------------
जूचंद्र न्यासाचा पुढाकार
या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री ग्रामदेवी जूचंद्र न्यासाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ग्रामस्थ, स्थानिक संस्था व स्वयंसेवक मोठ्या उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे हा स्वागत निश्चितच स्मरणीय ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

