भारत आदिवासी पार्टीकडुन नियुक्त्या
मोखाडा (बातमीदार) ः भारत आदिवासी पार्टी महाराष्ट्र प्रदेश महासचिव योगेश भिल यांच्या हस्ते पालघर जिल्हाध्यक्ष पवनकुमार हाडळ तसेच अंकुश होला यांची मोखाडा तालुकाध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदिवासींचे प्रश्न, समस्यांबद्दल भारत आदिवासी पार्टी आवाज उठवत आहेत. या पार्टीच्या माध्यमातून शासनाला नियमित विविध प्रकारची निवेदने दिली जातात. पार्टीचा विस्तार करण्यासाठी पार्टीचे महासचिव योगेश भिल यांनी पालघर जिल्हाध्यक्षपदी पवनकुमार हाडळ तर मोखाडा तालुकाध्यक्षपदी अंकुश होला यांची नियुक्ती केली आहे. या वेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव योगेश भिल, नाशिक जिल्हाध्यक्ष कांतिलाल जाधव, त्रंबकेश्वर तालुकाध्यक्ष संदीप गवारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

