पुणे लिंक रोड परिसर आता धूळमुक्त!

पुणे लिंक रोड परिसर आता धूळमुक्त!
Published on

पुणे लिंक रोडवर अखेर धूळमुक्त
कल्याण, ता. ४ (बातमीदार) : कल्याण पूर्वेतील मुख्य वर्दळीचा रस्ता असलेल्या पुणे लिंक रोडवर साचलेले मातीचे थर आणि धुळीचे लोट अखेर साफ करण्यात आले आहेत. आमदार सुलभा गायकवाड यांचे जनसंपर्क कार्यालय ते तीसगाव प्रवेशद्वारापर्यंत प्रशासनाने विशेष स्वच्छता मोहीम राबवल्याने हा परिसर आता धूळमुक्त झाला आहे.

पावसाळ्यानंतर या मार्गावर रस्त्याकडेला मातीचे मोठे थर साचले होते. कडक उन्हामुळे या मातीचे रूपांतर धुळीत होऊन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. दुचाकीस्वारांचे हाल होत असून उडणाऱ्या धुळीमुळे समोरचे दृश्य स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताची भीती होती. स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांना श्वसनाच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

स्थानिक नागरिकांनी या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर महापालिका प्रशासन आणि खासगी ठेकेदारांनी युद्धपातळीवर काम हाती घेतले. रस्त्याकडेला असलेला मातीचा ढीग पूर्णपणे खरवडून काढण्यात आला असून, रस्ता चकाचक करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही समस्या मार्गी लागल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. सोशल मीडियावरील तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने दाखवलेल्या या सक्रिय भूमिकेचे परिसरात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com