थकीत वीजबिल वेळेत भरण्याचे महावितरणचे आवाहन

थकीत वीजबिल वेळेत भरण्याचे महावितरणचे आवाहन

Published on

थकीत वीजबिल वेळेत भरण्याचे महावितरणचे आवाहन
मुलुंड, ता. ४ (बातमीदार) : आधुनिक जीवनशैलीत विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढते तापमान व दैनंदिन गरजांमुळे वीज वापरात लक्षणीय वाढ होत असून, त्याचा थेट परिणाम वीज देयकांच्या रकमांवर दिसून येत आहे. अनेक ग्राहकांकडून देयके वेळेत न भरल्याने थकबाकी वाढत चालल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
मुलुंड विभागात जानेवारी २०२६ महिन्यात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडून एकूण ५०.३० कोटींची वीज देयकांची मागणी नोंदवण्यात आली होती. त्यापैकी ४६.६४ कोटींची वसुली झाली असून, अद्याप ३.६६ कोटी इतकी थकबाकी प्रलंबित असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता दीपक जाधव यांनी दिली. या पार्श्वभूमीवर महावितरणने नागरिकांना वीज देयके अंतिम तारखेपूर्वी भरण्याचे आवाहन केले आहे. देयके थकीत ठेवल्यास वीजजोडणी खंडित करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com