कार्मेल कॉन्व्हेंटचा बॅण्ड राष्ट्रपतींच्या कौतुकास पात्र

कार्मेल कॉन्व्हेंटचा बॅण्ड राष्ट्रपतींच्या कौतुकास पात्र

Published on

कार्मेल कॉन्व्हेंटचा बॅण्ड राष्ट्रपतींच्या कौतुकास पात्र
खालापूर, ता. ५ (बातमीदार) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या खोपोलीतील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या स्काउट-गाइड बॅण्ड पथकाने शिस्तबद्ध सादरीकरणातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या १९व्या राष्ट्रीय जांबोरीमध्ये या बॅण्ड पथकाने महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संचलनाद्वारे मानवंदना दिली. याबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रीय बॅण्ड स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत या पथकाने ‘अ’ श्रेणी प्राप्त केली. या उल्लेखनीय यशामुळे रायगड जिल्हा मुख्य संचलन कार्यक्रमात राष्ट्रध्वज व मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी आणि बॅण्ड प्रदर्शन सादर करण्यासाठी पथकास विशेष निमंत्रण देण्यात आले होते.
या राष्ट्रीय जांबोरीमध्ये शाळेचे २५ स्काउट-गाइड विद्यार्थी व तीन शिक्षक सहभागी झाले होते. मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, व्यवस्थापक सिस्टर ज्युली मारिया, बॅण्ड मास्टर राजेश कुमार व गाईड कॅप्टन सरिता बडकूल यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले.

** फोटो ः मंत्री भरत गोगावले यांच्याकडून बॅण्ड पथकाला सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com