देवाच्या माळेचा बहाणा; कानसईत महिलेला ५० हजारांचा गंडा

देवाच्या माळेचा बहाणा; कानसईत महिलेला ५० हजारांचा गंडा
Published on

कानसईत महिलेला ५० हजारांचा गंडा
अंबरनाथ, ता. ४ (वार्ताहर) ः मंदिरात देवासाठी नोटांच्या माळा बनवायच्या आहेत, असे सांगत एका भामट्याने ५६ वर्षीय महिलेकडून तब्बल ५० हजार रुपये उकळल्याची घटना घडली. ही घटना कानसई परिसरात मंगळवारी (ता. ३) रात्री घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
सुरेखा धर्माधिकारी यांचे कानसई येथील स्थानक रस्त्यावर कटलरीचे दुकान आहे. मंगळवारी साडेआठच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या दुकानात आला. सुरुवातीला मेहंदीचे कोन, नेलपॉलिश व ब्रेसलेट खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याने संवाद साधत सुरेखा यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सुट्टे पैसे आहेत का? अशी विचारणा करून त्याने सुरेखा यांना पर्स उघडण्यास भाग पाडले.
पर्समधील रोकड पाहताच आरोपीने शिवमंदिरात देवासाठी ५०० रुपयांच्या नोटांच्या माळा अर्पण करायच्या आहेत. तुमच्याकडे असलेली रोकड द्या, पाच मिनिटांत सुट्टे पैसे आणतो, असे सांगून त्याने त्यांचा विश्वास अधिक दृढ केला. त्यावर विश्वास ठेवून सुरेखा यांनी ५०० रुपयांच्या १०० नोटा, असे एकूण ५० हजार रुपये त्याच्याकडे दिले. मात्र, आरोपी पैसे घेऊन पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरेखा यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र भवारी करत आहेत. अनोळखी व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com