मुंबई पुणे द्रुतगती मार्ग वीस तासापासून वाहतूक ठप्प

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग वीस तासापासून वाहतूक ठप्प

Published on

वीस तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प
खालापूर, ता. ४ (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी सायंकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे. खालापूर तालुक्यातील आडोशी बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर सायंकाळी ४.३०च्या सुमारास गॅसवाहक टँकर उलटून गॅस गळती सुरू झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. मुंबईकडे जाणारी वाहतूक तातडीने थांबवून ती पर्यायी मार्गाने, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात आली; मात्र २० तासांहून अधिक वेळ उलटूनही गळती आटोक्यात न आल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन हा अतिज्वलनशील गॅस घेऊन जाणारा टँकर उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तिसऱ्या लेनवर उलटला. टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे प्रवासी दत्ता शेडगे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी बोरघाट पोलिस मदत केंद्र व हेल्प फाउंडेशनला माहिती दिली. रसायनतज्ज्ञ, देवदूत पथक, हेल्प फाउंडेशन व अन्य यंत्रणांनी गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले; मात्र गळती मोठ्या प्रमाणात असल्याने व पुरेशी यंत्रणा नसल्याने ती नियंत्रणात येऊ शकली नाही.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल, तहसीलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक सचिन हिरे, महामार्ग पोलिस अधीक्षक तानाजी चाळके यांच्यासह विविध पथके तैनात आहेत. एनडीआरएफ पथकही रात्री दाखल झाले असून बुधवारी सकाळी तज्ज्ञांचे पथक पाचारण करण्यात आले आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद असल्याने खालापूर टोल व लोणावळा परिसरात तीव्र वाहतूक कोंडी झाली असून पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com