नवी मुंबईत रस्ते अपघातांचे सत्र; दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू

नवी मुंबईत रस्ते अपघातांचे सत्र; दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू

Published on

दोन रस्ते अपघातांत दोघांचा मृत्यू
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : नवी मुंबईत मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण रस्ते अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. वाशी खाडीपूल आणि पाम बीच मार्गावर या घटना घडल्या असून संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना पहाटे २ वाजण्याच्या सुमारास वाशी खाडीपुलावर घडली. तळोजा येथील उमर एजाज दायाजी (२३) हा परेलहून तळोजाकडे मोटारसायकलने जात असताना पुढील कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्याने त्याची दुचाकी कंटेनरवर आदळली. गंभीर जखमी झालेल्या उमरचा रुग्णालयात मृत्यू झाला. दुसरी घटना सायंकाळी ५ वाजता पाम बीच मार्गावरील एनआरआय सिग्नलजवळ घडली. नागपूरचा रहिवासी विपुल महेंद्र कंगाली (३०) याचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळली. गंभीर जखमी झालेल्या विपुलचाही उपचारापूर्वी मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com