१२० सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी पुढे ढकलली

१२० सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी पुढे ढकलली

Published on

१२० सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी पुढे ढकलली
मुंबई, ता. ४ : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील १२० सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या गुरुवार (ता. ५)पासून ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार होती; मात्र तांत्रिक अडचणीमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर १२० सदनिका विक्री करण्यासाठी नोंदणी करण्याबाबत म्हाडाने आवाहन केले होते; परंतु तांत्रिक अडचणीमुळे सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका ही गुरुवारी उपलब्ध होणार नाही, तरी सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका संकेतस्थळावर कधी उपलब्ध होईल, याबाबत म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ व प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात येईल, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com